पहिला पाऊस
पहिला पाऊस
ढग गरजले विज चमकली
पहिल्या पावसाची सर
धावत आली
पाऊस जोरात आला
मी धावत गेलो
चिंबचिंब भिजलो
पावसाच्या सरीला
कवेत घेता घेता
खाली पडलो
मग ती धावत आली
तिने हात दिला
मी ऊभा राहिलो
तिने कवेत घेतले
घट्ट मिठी मारली
पावसात भिजताना
तिने मुकाही घेतला
ति घरात घेवून गेली
दार बंद केले
साडीच्या पदराने डोकं पुसले
ओले कपडेही तिनेच काठले
तेव्हड्यात विज कडाडली
मी तिच्या कुशीत शिरलो
पावसाच्या ढगाळ वातावरणात
तिच्यासोबत जेवलो
मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो
ती डोक्यावर हात फिरवून
गाण म्हणू लागली
मग मी खुप उशिरा झोपेतून उठलो
आणि म्हणालो
आई.....पाऊस गेला का गं
