STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

पेरणी

पेरणी

1 min
194

चला चला शेतामंदी

चला करूया पेरणी

पीक येईल जोमानं

सुखावेल ही धरणी....!!


कुणी आणा रे बियाणं

कुणी आणा खत पोती

पीक डोलेल रानात

बळी पिकवितो मोती...!!


आला नक्षत्र पाऊस

आल्या पावसाच्या सरी

बळी चालला जोमान

हर्ष मायना रे उरी......!!


यंदा पिकू दे रे खूप

देवा पांडुरंग हरी

खूप पिक पिकू दे

राहो कृपा आम्हांवरी....!!


आले ट्रॅक्टर हे दारी

लुप्त बैलजोडी झाली

गेली काळाच्या ओघात

नवं तंत्र,यंत्र आली.....!!


नको देवूस दुष्काळ

पडो रे पाऊसपाणी

पीक डोलेल शिवारी

येई मुखातली गाणी.....!!


बळी जगाचा पोशिंदा

चला करूया पेरणी

देवा संकटी धाव तू

चिंता रे तुजचरणी.......!!


खूप पिकू दे शिवार

बाप माझा पांडुरंग

त्याच्या घामानं भिजलं

आज सार अंग अंग.....!!


नाही भरवसा मज

ये रे विठ्ठला धावून

विठु गालात हसला

सा-या भक्ताला पाहून....!!


खूप पिकू दे शिवार

शालू हिरवा नेसून

पोटपाणी पिकु दे रे

लागा कामाला कसून.....!!



Rate this content
Log in