पाय जमिनीवर ठेवा
पाय जमिनीवर ठेवा
आकाशात गगणभरारी घ्या
पण पाय जमिनीवर ठेवा
जिवनात कितीही पुढे जा
पण नका करू कुणाचा हेवा....!! १!!
रक्तापेक्षा मानलेली नाती थोर
मैत्रीमध्ये नका होऊ शिरजोर
प्रेमात हवा विश्वासाचा धागा
नाहीतर निघेल टवाळखोर पोर...!! २!!
चार दिवसाची जिंदगाणी वेड्या
रोज जगतोस खोट्या आशेवर
खाली हाताने येशील,जाशील
एक दिवस तुच सरणावर...!!३!!
भुलथापा भरपूर झाल्या रे
नाही कोणी जगात इतकं वेडं
आता गावोगावही समृद्ध होत आहे
कोणतच नाही राहीलं खेडं...!!४!!
पैसाअडका खूप असेल जरी
माणुसकीही ठेव थोडी
गरिबांच्या पोटाची भूक भागव
जिवनात वाढेल आपोआप गोडी...!!५!!
क्षणभंगुर हे जीवन सारे
नाही येथ उद्याचा भरवसा
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला
आता तरी तू जाग माणसा.....!!६!!
जिकडे जाईल तिकडे खोटेच बोलणे
स्वतःच स्वतःला फसवत आहेस
आंतरात्म्याचा आवाज ऐकत जा जरा
उगाच कशाला रूसवत आहेस....!!७!!
लाखो आले लाखो गेले आजवरी
पुण्य कमावले फक्त काहीजणांनी
कोणी जिंकले कशाकशाने तर
कोणी कोणास जिंकले मनानी....!!८!!
मोहमाया आहे सारी इथे माणसा
जमिनीवर ठेव पाय थोडे
चांगल्यास मिळते चांगले सारे
वाईटास पडतात रोज जोडे.....!!९!!
