STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

पावसाला विनंती

पावसाला विनंती

1 min
472

कितीही विनंती केली तरी पाऊस नाही यायचा

पाऊस येत नाही म्हणून

दोष कोणाला द्यायचा

मी विचार करतो

अर्धा तुकडा जमिनीचा 

देवाच्या नावे करायचा 

देवाकडून आता पाऊसच विकत घ्यायचा


दरवर्षी हवामानाचा 

अंदाज चुकतो

पंढरपुरच्या विठोबाला साकडं घालतो

होम-हवन करूनही पाऊस येत नाही

बळी देऊनही 

देव प्रसन्न होत नाही

तारीख पे तारीख पाऊस

पुढे सरकत असतो

देव पाण्यात बुडवूनही

पाऊस येत नसतो

कितीही नतमस्तक झालात तरी

पाऊस ऐकायचा नाही

ये रे ये रे म्हटलं तरी यायचा नाही


पाऊस वेळेत नाही आला तरी राग धरतात

अवकाळी आला तर भरपाई मागतात

मुसळधार आल्यावर

सारेकाही वाहून जाते

वादळ वाऱ्यात बरेच

नुकसान होते

पिकले नाही तर रड रड असते

उत्पन्न घटले की मर मर असते

पावसाचा कोप आता सहन करायचा

भजन कीर्तन करूनही पाऊस नाही यायचा


आरक्षण मागायला बरीच गर्दी दिसते

आंदोलन मोर्चाला किती मोठी लाईन असते

याच गर्दीने एक एक झाड लावले तर

पाऊस कधीच रूसणार नाही

एकही शेतकरी गळ्याला

फास लावणार नाही

पाऊस बरसला की वसुंधरा हसेल

झरे झिरव्यात तलाव तळव्यात

पाणी वाहताना दिसेल

तेव्हा फुकटाचा पाऊस आहे

आता आडवून ठेवायचा

थेंब थेंब पाण्याचा मातीत

जिरवायचा


Rate this content
Log in