STORYMIRROR

Manasi Deshingkar

Others

3  

Manasi Deshingkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
188

चाहुल त्याची लागता फुलवूनी पिसारा मयुर नाचे वनी

ओल्या मातीच्या सुगंधाने आठवणी दाटतील मनी...


जशी पावसाच्या सरींना लागली मातीच्या स्पर्शाची ओढ

तशी मनातील भावनांना मिळते डोळ्यांतील आसवांची जोड...


पावसाचं आणि प्रेमाचं एक अतूट बंधन असतं असं

कवीने सजविलेले शब्दांचं एक नाजूक कोंदण असतं जसं...


पाऊसही कधी वैऱ्यासारखा रौद्र रुप धारण करतो

मनावरती आघात करून टचकन डोळा पाणी आणतो...


परी नंतर रिमझिम बरसतो

दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालतो...


Rate this content
Log in