STORYMIRROR

Manasi Deshingkar

Others

4  

Manasi Deshingkar

Others

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

1 min
449

संतांची परंपरा लाभलेली ही महाराष्ट्र भूमी

हिंदवी स्वराज्याच्या राजाची ही जन्मभूमी

महाराष्ट्राच्या जिल्ह्यांची ही वेगळी कहाणी

जिथे जाऊ तिथे वेगळे पाणी, वेगळी राहणी

आंबा, काजू, फणस कोकणची संपत्ती

राजधानी रायगड सांगे शिवरायांची महती

फेसाळणारा समुद्र झगमगत्या मुंबईची शान 

पेशव्यांच्या पगडीचा पुण्याला मिळाला मान

कोल्हापूरच्या अंबाबाईची सर्वांवरी कृपा

जोतिबाचा डोंगर सांगे माणुसकी जपा 

अठ्ठावीस युगे विटेवरी उभा आहे सावळा हरी

वारकरी करतो न चुकता आषाढी वारी

मराठवाडा, विदर्भाचा एक वेगळाच ठसा

परंपरा जपण्याचा त्यांनी घेतला वसा

या लाल काळया मातीचा आपला एक मान

हे, महाराष्ट्रा मला तुझा प्रचंड अभिमान

दिल्लीवर नजर रोखुनी उभा सह्याद्री माझा

गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.


Rate this content
Log in