लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा
1 min
253
आठवतात ते दिवस..
पहिल्यांदा शाळेत जाताना रडलो होतो,
पावसाच्या पाण्यात उड्या मारत घरी आलो होतो,
भातुकलीच्या लुटूपुटू संसारात रमलो होतो,
स्वतःलाच सचिन समजून क्रिकेट खेळलो होतो,
मज्जा, मस्ती ,भांडणं करत नवीन जगात प्रवेश करत होतो,
भविष्याची नव्हती चिंता,स्वप्नांच्या दुनियेत मात्र रंगलो होतो,
आता फक्त बालपणीच्या आठवणीत हरवतो आहे,
'लहानपण देगा देवा' म्हणून गीत गातो आहे.
