STORYMIRROR

Manasi Deshingkar

Others

3  

Manasi Deshingkar

Others

प्रेम आणि मैत्री

प्रेम आणि मैत्री

1 min
259

प्रेम आणि मैत्री यांची व्याख्या सांगणं खूप सहज, सोपं असतं...

न दिसणारी यांच्यातील अस्पष्ट रेघ समजून घेणं खूप कठीण असतं...

कधी प्रेमासाठी मैत्रीचा त्याग करणं कठीण असतं

तर कधी मैत्रीसाठी प्रेमाची आहुती देणं सोपं नसतं...

कधी राधा कृष्णाचं उदाहरणं देणारं प्रेमाचं नातं असतं

तर कधी कर्ण दुर्योधनाच्या मैत्रीसाठी घडणारं महाभारत असतं...

मात्र जीवनात प्रेम आणि मैत्री यासारखं सुंदर नातं कोणतंच नसतं...

जीवनाच्या प्रवासात आपल्या माणसांचा हात हाती घेऊन चालायचं असतं...

मैत्रीच्या धाग्याने बांधून आणि प्रेमाची हळुवार फुंकर घालत जीवन जगायचं असतं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन