चारोळी
चारोळी
1 min
86
१. स्वप्नांच्या दुनियेत तिला
राजकुमार भेटायचा
वास्तविक जगात मात्र
नशिबी एकटेपणा यायचा
२. आठवणींचा हळवा कप्पा
मनाच्या तळाशी असलेला
चेहऱ्यावरच्या हास्याने
वेदनेची कळ लपवलेला
३. काळजाच्या जखमेवर
हळुवार स्पर्श मायेचा
डोळ्यांतील आसवांना
पुसणारा हात मैत्रीचा
४. चांदण्यांनी भरलेलं आभाळ
तिच्या स्वप्नांचं
सूर्याच्या प्रखरतेने
झाकोळलं अस्तित्व तिचं
