पाऊस असाही
पाऊस असाही
1 min
211
गडगड होता नभात ढगांची
विजेची लख्ख चकमक झाली
झोपडीतल्या गरीब माणसांची
झोप पहिल्या पावसाने उडाली
फाटक्या संसाराची जोडलेली
रंगबिरंगी ठिगळं चिध्यांची काही
आभाळातील इंद्रधनुष्य ते सुंदर
पाहून फारसे त्यास सुखावत नाही
कोसळतो पाऊस धरतीवरती
पावसाने वनचरे जरी तृप्त केली
गळत्या छपराने डोळे पाणावती
गरीबाची झोपडी मात्र नदी झाली
जगण्याचा प्रश्न येतो ठायी ठायी
प्रत्येक पावसात हीच अवस्था होई
उध्वस्त संसाराचे चटके सोसताना
भिजलेले अंग अंग जाळीत जाई
