STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

पारख नात्यांची

पारख नात्यांची

1 min
182

चार भिंतीतला आवाज

बाहेर जाऊ लागतो,

जो तो कान लावून

सगळं ऐकू लागतो


घरातल्या वादांना

पंख फुटू लागते,

क्षणाक्षणाला जीवन

नकोसे वाटू लागते


त्या वादाचा फायदा घेण्यास

जो तो पुढे सरसावतो,

तुम्हाला संपवण्यासाठी त्यांना

आयताच विषय घावतो


कोणत्याही शत्रूत ताकद नसते

तुम्हाला संपवण्याची,

पण जवळचे भेदीच वाट पाहती

तुमच्या अधोगतीची


सावध रहावे त्यांच्यापासूनी

निकटवर्तीय जे तुमचे म्हणवती,

नाही समजत कावा त्यांचा

गाफील ठेवूनी तुम्हा संपवती


म्हणून जगावे आनंदाने

परंतु नेहमी सतर्क रहावे,

नाते असावे कोणतेही मग

प्रत्येकास नीट पारखूनी घ्यावे...!!!


Rate this content
Log in