STORYMIRROR

उमेश तोडकर

Others

3  

उमेश तोडकर

Others

पाणी

पाणी

1 min
309

“पाणी” एक एक थेंब

अमृताचा

“पाणी” एक एक थेंब

तहानलेल्या जिवांचा

एक एक थेंब

सुकलेल्या घशाचा

एक एक थेंब

तहानलेल्या ओठांचा

एक एक थेंब

साठलेल्या तळ्याचा

एक एक थेंब

वाहत्या नदीचा

एक एक थेंब

समुद्राच्या लाटेचा

एक एक थेंब

बरसणाऱ्या पावसाचा

एक एक थेंब

वाहणाऱ्या निखळ ओढ्यांचा

एक एक थेंब

उन्हाळ्यातील गारव्याचा

एक एक थेंब

निसर्गाच्या हिरवाईचा

एक एक थेंब

हा साठवायचा

एक एक थेंबात

निसर्ग सजवायचा

एक एक थेंब

क्षणोक्षणी वाचवायचा

एक एक थेंब

सत्कारणी लावायचा

थेंबा थेंबातूनच होतात

सर्व गरजा पूर्ण

प्रण करू आपण

प्रत्येक थेंब वाचवायचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन