ओंजळ भरली सुखांनी
ओंजळ भरली सुखांनी
1 min
32
ओंजळ भरली सुखांनी
मन चिंब चिंब ओले झाले
ढगांची दाटी नभात होता
नारायण ओझरते गेले
आनंद विखुरला ओजंळभर
मन डोलू लागले हिंदोळ्यावर
खळखळत्या झर्यामध्ये मन
झुलू लागले या वार्यावर
श्रावण सरींचा सुरू झाला
खेळ माझ्या अंगणी
रमला वारा सोसाट्याचा
खेळ ढगांचा सांगूनी
