ओढ पावसाची
ओढ पावसाची
ओढ पावसाची माझ्या जिवाला
आवडते चिंब पावसात भिजायला
थेंब थेंब ओजंळीत साठवताना
आवडते थेंबाचे मोती झेलायला
ओढ पावसाची माझ्या जिवाला
ओघळत्या सरींना कवेत घ्यायला
गवताच्या पात्यासंगे डोलायला
आवडते मज पाण्यात रमायला
ओढ पावसाची माझ्या जिवाला
खळखळत्या पाण्यासंगे धावायला
इंद्रधनूच्या सप्तरंगात रंगायला
आवडते मज कोकीळेसम गायला