ओढ पावसाची...
ओढ पावसाची...
1 min
48
वैशाख वणवा, सरता सारेना
रुक्ष केले, सर्व जीवना
ओढ लागली पावसाची..
वरुनी भास्कर, खालुनी धरती
पसरली अवर्षणाची किर्ती
ओढ लागली पावसाची..
पेटले आकाश, पेटली धरनी
कोणा न कळे, अशी ही करनी
ओढ लागली पावसाची..
धरतीची लेकरे, निघती भाजुनी
नयनही सुकले, अश्रु पिऊनी
ओढ लागली पावसाची..
बळी हारला, आर्त केला
कोणिही नसे, तया धिराला
ओढ लागली पावसाची..
ऐकता गर्जना मेघांची,
कळी फुलली सृष्टीची
ओढ लागली पावसाची..