STORYMIRROR

Parijatak Parijatak

Others

3  

Parijatak Parijatak

Others

कठपुतली

कठपुतली

1 min
26

दैवाच्या हातची, वेळेच्या हातची 

की..कर्माच्या हातची..?

की असच..कोणाच्याही हातची..??

असेल कोणितरी..असेल कोणिही

पण येऊनी बांधती..नाजुक बांधांनी

आणि जीव ओतुनी .. जातात निघुनी.

मग जगायच..लाचार होऊनी

की बंध तोडुनी..??

पण काय असते कठपुतलिच्या हाती ..??

शेवटी प्रश्न तर उरतोच..

बंध तो रक्ताचा की मनाचा..??

रक्त तर तोडूनही तुटणरं नसतच मुळी..

मग तो बंध तरी तुटेल कसा..??

कसाही असो .. जपला जातो..

नव्हे जपावाच लागतो..

पण..मनाचा बंध मात्र निराळाच ..

कोणीही..कसाही..कधीही जोडा

कोणिही..कसाही...कधीही तोडा..

कळणार तरी काय त्या कठपुतलिला..??

कळणार तरी काय कोणाला..??

येणारे येती..

कठपुतली बनवून मजा लुतुनी घेती

बंध बांधुनी तोडुनी हसती

आणि हास म्हणुनी कठपुतलिलाही सांगती

अन...मन भरलं की.. निघूनही जाती..

मी कोण...?? एक कठपुतली..??

दैवाच्या हातची, वेळेच्या हातची 

की..कर्माच्या हातची..?

की असच..कोणाच्याही हातची..??


Rate this content
Log in