एक भास
एक भास

1 min

40
विचारांचा प्रवाह, वाहत होता शांत
क्षिण आत्म्याला नव्हती कसलिही भ्रांत
तु आलीस आणि
सगळ्या व्याख्याच बदलून गेलीस..
दिलेस शब्द, दिलेस हास्य
जीव ओतला, केलेस मनुष्य
गुण तुझे गाण्यात,
मजा होती त्या रमण्यात
सतत अधीर तुझे शब्द झेलण्या
आता...सगळ्याच कथा सुण्या सुण्या
ओतला जीव, घेतलास काढुनी
तडफडाया मला, गेलीस सोडुनी
आता..मुंग्यासम आठवणी, येऊ लागल्या दाटुनी
सर्रर्रर्रकन गेला काळ सरकुनी, काय करु हे सगळे उमगुनी
भयाण तो विरह, कठोर ती शिक्षा
का मिळाली, जगण्याची ही दिक्षा
नाही कळली संध्या-सकाळ
गेली तुटुनी ही दीप माळ
सळसळ झाली पानांची
जाण झाली क्षिण आत्म्याची
छे..मृतात्म्यांना होत नसतात कधी भास
त्यांचं जीवनच असतं उदास-भकास...