शांत अथांग तळं
शांत अथांग तळं
1 min
441
किती खोल आणि अथांग असं हे तळं..
दिवसभर गजबजून गेलेलं
देखणं शुभ्र आणि किती बोलकं..
भुरळ पाडणार्ं..
आणि रात्री..
एकाकी..शांत..काळोखाने भरुन गेलेलं
गुढ विचारांत गढून गेलेलं..
वाऱ्याच्या झुळकेने लहरी उमटल्या
पण..तिरावर येण्याआधिच विरुन पण गेल्या..
उमेदीच्या किरणांची आशा बाळगून
स्तब्ध होऊन राहिलेल्ं..
