STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

नविन वर्ष माझे संकल्प

नविन वर्ष माझे संकल्प

1 min
162

नविन वर्ष हे/ येवोत सुखाचे/

छान आरोग्याचे / लाभो सर्वा //


नका मद्यपान /नकोच विकृती/

सदृढ प्रकृती / असू द्यावे//


काय हो होईल/ एका दिवसाने/

धुंद हो मद्याने /होऊ नका//


नको खाणेपिणे/ नको नाचगाणे/

नको रे वागणे /सोडा आता//


करावा संकल्प /काहीतरी छान/

ज्याने वाढे मान /सर्वाप्रती//


चांगले शिकावे /चांगले वागावे/

आनंदी जगावे /सर्वानिया//


 नववर्षाचा हो /संकल्प करूया /

झाडेच लावूया /वृक्षवल्ली//


रक्तदान श्रेष्ठ/ अन्नदान श्रेष्ठ/

नेत्रदान श्रेष्ठ /ध्यानी ठेवा//


नूतन वर्षाच्या /सर्वांना शुभेच्छा/

पुर्ण होवो इच्छा /सर्वाच्याच//


Rate this content
Log in