नव्हे श्रद्धा हवी
नव्हे श्रद्धा हवी
1 min
315
मानवाची प्रगती खुप व्हावी
दैव वादाची कल्पनाही साकार व्हावी
खुप करावा उदो उदो
पण अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा हवी
कोणी महिला डाकण नाही
मानव म्हणुनी स्विकार व्हावी
माया तिलाही तेवढीच म्हणून
अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा हवी
किती कष्टाने वाढलं पिक
जीवापाड हे राखले रान
नको नरबळी आता दादांनो
अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा हवी
देव तुमचा आमचा
नसे तो वैयक्तिक कोणाचा
घेवूनी नाम तयाचे गोड
अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा हवी
देतो तो धीर जनाला
नाही त्याला मोह जीवांचा
कोंबडं, बकरं नको त्याला
अंधश्रद्धा नव्हे श्रद्धा हवी
