STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
431

चित्रकार तो चित्रकार

विलोभनिय चित्र रेखाटले

निर्सगाच्या कलाकृतीचे

बघताच त्याकडे मन मोहरले.


बर्फाने आच्छादलेले पर्वत

प्रतिबिंब दिसे त्यांचे तळ्यात

शंकुची झाडेही उभी ओळीत

अप्रतिम दृष्य हे तरंगे पाण्यात.


वरचे आकाश ही झळके पाण्यात

निल नभ, निळेभोर दिसे तळ्यात

निळा पांढरा व हिरवा रंग रेखाटला

नभ,पर्वत व झाडांनी त्या पाण्यात.


तळ्या भोवताली हिरवे गालीचे

निर्मिले पर्जन्य राजाने

रम्य विलोभनिय दृष्य तरंगे

पाहताच फिटे डोळ्यांचेे पारणे.


कुरणावर रंगबेरंगी गवतफुले

झोके घेती झुळझुळ वाऱ्यावर

तळ्यात ही तरंग उठती मंद गतीने

पाहुनी मन मोहुन जाते त्या दृष्यावर.



साहित्याला गुण द्या
लॉग इन