निसर्ग गीत
निसर्ग गीत
गर गरजले ढग
चमचम चमकली विज
काळेभोर झाले आकाश
रिमझिम पडला पाऊस
ही पावसाची सर
आली भरभर
चिंब झाले अंग
चला नाचू गावू संग।।धृ।।
हा मंद धुंद वारा
फुलवी पिसारा
चिमणी पाखरे भिरभिरली
शेतमळे फुलली
मैना कुहु बोले
मोर थुई थुई नाचले
पक्षी झाले दंग
चला नाचू गावू संग।।१।।
हा सह्याद्रीचा घाट
त्याला नागमोडी वाट
दऱ्याखोऱ्यातून वाहे
झुळ झुळ पाट
ही डोंगराची शान
त्याला चौफेर रान
हिर त्याचा रंग
चला नाचू गावू संग।।२।।
सुगंध आला मातीला
औत खांद्यावर घेतला
ओल्या ओल्या मातीत
दाणे मोत्याचा पेरला
गोफण भिरभिरली
कणीस डोलली
चिमणी पाखरे संग ।।३।।
चला गावू संग
