निजधाम
निजधाम
1 min
66
निजधाम माझे । मांगल्याचे रुप ।
आवडीचे खूप । मजलागी ।।
सदन शुमम् । आनंदाचे धाम ।
सदा हरी नाम । चालतसे ।।
येता सणवार । जमे गोतावळा ।
आनंद सोहळा । भासतसे ।।
भुकेलेल्या अन्न । तहान्हेल्या पाणी ।
सदा गोड वाणी । मुखी असे ।।
आतिथी सन्मान । होई सदाकाळ ।
प्रसन्न सकाळ । भासे सदा ।।
हसरे सदन । नामे ओळखती ।
अशीच महती ! शुभमची ।।
माझे हे शुभम् । प्रेमाचा उमाळा ।
मायेचा जिव्हाळा । सांगे वैशू ।।