नेता असावा कसा...
नेता असावा कसा...
जनतेचे प्रतिनिधित्व करण्याकरिता
जनतेने निवडला सेनापती शूर,
खूपच गुणवान, खूपच बलवान
भलताच होता त्याचा नूर
त्याला निवडून जनता सारी
भलतीच आनंदित होती,
त्यांना आता दडपशाहीची
भीती मुळी उरली नव्हती
हळूहळू मग धनदांडग्यांनी
परिस्थिती ही अचूक हेरली,
आपलेसे त्याला करण्याच्या
योजनेने उभारी धरली
पैशाचे ते आमिष दावूनी
वळवले त्याचे मन,
विसरूनी गेला नीतिमत्ता
पाहूनी इतके धन
गाफील ठेवून जनतेला तो
हानी त्यांचीच करू लागला,
जनतेच्या जीवावर निवडून येऊन
कार्यभाग स्वतःचा साधला
नेता असावा असा की त्याला
लालूच नसावी पैशाची,
कार्य करूनी महान त्याने
मने जिंकावी जनतेची...!!!
