STORYMIRROR

@Aniket Maske

Others

3  

@Aniket Maske

Others

नाव तुझे रे मंगलमूर्ती

नाव तुझे रे मंगलमूर्ती

1 min
78

काय वर्णावी तुझी महती

शब्दात मावेना तुझी स्तुती

सान थोर जयघोष करती

नाव तुझे रे मंगलमूर्ती...


स्वार होऊनी मुषकावर

सत्ता गाजवी जगतावर

प्रथम दर्शनी तुला पुजती

प्रिय तुला दुर्वा वाहती...


स्वागता नटले अंबर धरती

सृष्टी सारी गुलाली न्हाती

विरह सोसते आई पार्वती

तु ताव मारतो मोदकावरती...


मस्तक झुकते कैक देवांपुढती

माझा विश्वास तुझ्याच वरती

मित्र, सखा अन तुच सारथी

तूच तारतो नौका बुडती...


संकट काळी तुला स्मरती

सुखाच्या क्षणी तुझा आभारी

वसते माझ्या मनाच्या गाभारी

नाव तुझे रे मंगलमूर्ती...


Rate this content
Log in