नात मैत्रीचं
नात मैत्रीचं
नातं मैत्रीचं, जीवापाड जपायचं
मित्रावर ना कधी रुसायच....!!
झाले जरी मतभेद, हळूवार विसरायचं
मोठ्या मनानी माफ करत हातात हात मिळवायचं...
संकटकाळी मित्राकडे धावायचं
करता आली मदत, मनातून करायचं....
मित्र म्हणजे सखा, सोबती ध्यानी ठेवायचं
सुखाच्या क्षणी मित्राला, नाही कधीच विसरायचं...
नातं मैत्रीचं परमेश्वरची खास भेट
खास तुमच्यासाठी देवानं दिलेली थेट....
नातं मैत्रीचं म्हणजे दिल, दोस्ती, दुनियादारी
नातं मैत्रीचं म्हणजे मित्रातली फक्त यारी....
नातं मैत्रीचं प्रेमरूपी सिंचन पाण्याचं
नातं मैत्रीचं म्हणजे अमृत जीवनाचं....
