Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Govardhan Bisen

Others

4.7  

Govardhan Bisen

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
218



(वर्ण संख्या :- १६, यती - ८)


चिंब पावसानं रानं, झालं ओलं प्रत्यक्षात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||धृ||


सुर्य दिसेनासा झाला, आज भरल्या दुपारी |

चहुकडे अचानक, नभ अंधारला भारी ||

मग बरसले ढग, धाऊ लागले नभात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||१||


माळ तुटावी मोत्यांची, तशी आली सर खाली |

वृक्ष, पाने, फुले, यांची, आंघोळच चिंब झाली ||

थेंब थेंब पावसाने, थंडी भरली अंगात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||२||


पहिल्याच पावसाची, ओढ प्रत्येकाला राही |

वाट चातका सारखी, शेतकरी सुध्दा पाही ||

सगळेच वाट याची, निरखून बघतात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||३||


पावसाळा म्हटला की, येतो डोळ्याच्या समोर |

कांदाभजी आणि चहा, खाती लहान नि थोर ||

मुले मुली सगळेच, आनंदाने नाचतात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||४||


पावसाच्या थेंबामुळे, आज अवनी भिजली |

आनंदाने चोहीकडे, सृष्टि नटून सजली ||

मृदगंध  पावसाचा, भरे या आसमंतात |

आनंदाने भिजलो मी, पहिल्याच पावसात ||५||



Rate this content
Log in