मोर...
मोर...
1 min
266
मोर नाचे डौलात...
वनी मयूरपंख फुलवूनी...
एका तालात..
गातो एका सुरात कुंजवनी...
मेघ दाटता नभी...
आनंदी आनंद आसमंतात...
बागडे मनमौजी...
थुईथुई नृत्य करी एकांतात...
राष्ट्रीय पक्षी मोर...
सौंदर्याची लाभली खाण...
रंग आकर्षक...
संवर्धन करण्याची असावी जाण...