मोगरा फुलला...
मोगरा फुलला...
1 min
436
मोगरा फुलला,
मनाचिया मनी,
सुगंध दरवळला,
दाही दिशांत वनी...
मोगऱ्याचा गजरा,
माळला केसात,
मनमोहक सुगंध,
साजणी हसे गालात...
अत्तरात मोगरा,
वास वेगळा,
शिंपडता द्रव्य,
परिमळ आगळा...
दिसे शुभ्र श्वेत वर्ण,
रूप मोगऱ्याचे,
सणासुदी महत्त्व,
बहरे प्रेम हृदयाचे...
