मनविभोर
मनविभोर
1 min
199
मनविभोर धुंद फुलांचे
हे गुज आहे सुगंधाचे
तल्लीन होऊन वा-यासवे
तोटुन बंधन धंदाचे
हिरव्या हिरव्या पानामधुनी
लाल पाकळी फुलते
कोकीळेचे ऐकुन गुंजन
मन पाखरु डुलते
आठवन तुझी येता मनी
साद घालीतो वारा कानी
दवबिंदुचे टिपता मोती
ऐकु येते तुझीच गाणी
येती उफाळून तुझ्याच लाटा
झुळझुळ नाद झरण्याचा
कुठे भटकी चुकार होडी
हट्ट तिला हो धरण्याचा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
