मनातल्या गाठी
मनातल्या गाठी

1 min

11.6K
मनातल्या गाठी माझ्या
किती बांधल्या किती जोडल्या
झाला कितींचा गुंता अन्
किती पुड्या मी सोडल्या
साठवले मनात बरेच काही
होते ओठात बरेच काही
परी नाही कांगावा झाला
खोल तळात साठा केला
काळ पुढे सरकला
निसटल्या हळूवार गाठी
कशास धरता तिढी
प्रेमाने मारावी मिठी