STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

मनातला गोळ

मनातला गोळ

1 min
227

मनात काय चाललयं

मनात जावून कळले असते तर

सांगता आले असते

पण अस होत नाही

म्हणून मनातला काहोर शांत होत नाही


त्या मनालाच कळत नाही 

त्याची होणारी चलबिचल विचारांची अदलाबदल

ते वेगळ्याच विचारांच्या गर्दीत

कुठेतरी ते भटकत असते

नेमके काय होत त्या मनालाही कळत नसते


मनातलं ओळखता येत नाही म्हणून 

मिंनटा मिंनटाला बदलणार मन कसेही वळण घेते

भितीच्या ज्वाला लपेटून चुकिच्या दिशेने पळते 

देत असतो अंतरात्मा फसगत होण्याचा ईशारा

कुठेतरी अडकलेल्या मनात फक्त

कुविचारांची धडधड असते


किती चांगलं किती वाईट

मनाला कळतं असतानाही

त्या मनातला कल्लोळ थांबत नाही

नकोत्या विचारातून बाहेर पडत नाही

मनाच्या विरोधात जावून

आपलीच राख झाली असते

त्यांतर एक शापित आत्मा घेऊन जगायचे असते


पावले चुकताय 

डोळ्यांना दिसतं असतानाही

पाय माघे घेत नाही

ताबा सुटलेल्या मनावर नियंत्रण ठेवता येत नाही

उध्वस्त होते जगने तेव्हा

चुक कळते

चुकले ते चुकले चुकिला माफी नसते

स्वतःलाच स्वतःच्या अश्रूंनी कितीही न्हावू घातले तरी आयुष्य पुन्हा सुंदर दिसणार नसते


Rate this content
Log in