STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे

1 min
364

प्रगती करतोय माझा देश

तरीही जातीयवादात अडकला आहे,

पण खरं सांगू का,

तरीही मला माझ्या देशाचा अभिमानच आहे.


अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने

मिळाले आम्हा स्वातंत्र्य आहे,

परंतु, असेच वाटते की,

हे स्वातंत्र्य नसून पारतंत्र्यच आहे

पण असे असले तरीही तुम्हाला सांगतो

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे.


आजच्या तरूणाईला

रोजगारीची उणीव भासत आहे,

दुष्ट शक्तींच्या नादाने ती

चुकीच्या मार्गाला जात आहे,

नकळत त्यांचे भविष्य

मातीमोल होत आहे,

पण मित्रांनो,

तरीही मला माझ्या देशाचा अभिमानच आहे.


विज्ञानाच्या युगात आम्ही

अनेक शिखरे पादाक्रांत केली,

विश्वाला गवसणी घालता घालता

आम्ही चंद्रावरही स्वारी केली,

इतके करूनही अंधश्रद्धेने आमची

पाठ नाही सोडली

पण काहीही असो मंडळी

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे.


परकीय शत्रूंना सामोरे जातानाच मात्र

देशातच तुकडे पडताहेत,

भ्रष्ट राजकारणी राजरोसपणे

देशाला लुबाडताहेत,

दिवसेंदिवस सामान्य जनतेची

होतेय पिळवणूक आहे,

पण कितीही वाईट परिस्थिती असली

तरीही मी जन्मलो याच देशात आहे,

हा देशच माझ्यासाठी जीव की प्राण आहे,


त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत

माझ्या तोंडी हेच वाक्य असेल की,

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे

मला माझ्या देशाचा अभिमानच आहे

 मला माझ्या देशाचा अभिमानच आहे...


Rate this content
Log in