मी व माझ अस्तित्व
मी व माझ अस्तित्व
मी ज्यांना माझं म्हणतो
ती माझी माणस खरचं माझ्यासाठी किती जगतात....? मला माहीत आहे
तरीही त्यांच्या सुखासाठी मी धावत असतो
त्यांचा हसरा चेहरा पाहून
जगत असतो
भविष्यात त्यांचा आधार मीळावा म्हणून
मी त्यांच्या भविष्याचा विचार करायचा
ते मौजेत मस्त असतात
मी मात्र कष्ट करून घाम गाळायचा
आयुष्यभर माझी मरमर असताना
मी त्यांच्या आनंदात कधी दिसतच नाही
त्यांच्या अपेक्षांच ओझ वाहताना
क्षणभर सुखही कधी मिळत नाही
धावपळ करूनही
बोल कुणाचे प्रेमळ नसतात
सोबत राहुनही परक्यासारखे वागतात
स्वतःच जगणं विसरून
सार आयुष्य त्यांच्यासाठी संपावतो
त्यांच्यात माझं अस्तित्व आहे की नाही
प्रश्न मला पडतो
आपलीच माणसं या हळव्या मनावर किती घाव घालतात
पळणारी पाय थांबल्यावर
अतंर देत असतात
परिश्रमाच्या वाटेवर
ज्यांच्यासाठी देह झिजतो
त्या थकल्या भागल्या देहाला
फक्त सहानुभूतीची गरज असते
माणुसकीच्या सावलीत
थोडीशी विश्रांती हवी असते
आयुष्याच्या मावळतीला कळते
आपली माणस आपली किती असतात
पण तेव्हा ते कुठल्याही नात्यात नसतात
खरचं हा जगण्याचा प्रवास
खुप कठीण आणि अवघडं असतो
या अवघड वाटेवर मात्र
सहप्रवासी कोणीच नसतो
