Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract Tragedy

3  

Manisha Wandhare

Abstract Tragedy

मी आले चालून...

मी आले चालून...

1 min
2


(का? म्हणाली दुनिया,

मुलगी परक्याचे धन,

दोन जागेचा हा खेळ,

सासर माहेरचे मन ,

झाले किती कठीन ) ...

(बाबा तुझी लाडकी ,

बघ आता दुसऱ्या घरी जाणार,

कशी ही रीत समाजाची,

काळजाला काळजापासुन दुर करणार ).

सख्या आल्या धावुनी ,

नवरी मुलगी सजली लाजुनी,

अंतरपाट धरला दोघांमध्ये,

वरमाला गळ्यात घालुनी ...

चालली मनाची घालमेल,

राहून राहून उराला येई उधाण,

माहेर समोर दिसता ,

आठवते बालपण...

(आई तुझी लाडकी ,

गळ्यात मंगळसुत्र बांधुनी ,

तु पकडुनी हात तिचा ,

कशी करशील पाठवणी )...

आंबा झेंडूची तोरणे ,

चहूबाजूनी उतरणी ,

होम कुंड पावित्र्याचा ,

हात हाती घेतला बाबा तु,

कन्यादानाच्या क्षणी ...

डोळे भरले आसवांनी,

फुटला पाझर मनी,

उंबरठा ओलांडतांना,

पावले जड झाले भावनांनी...

नव्या स्वंप्नाची चाहूल,

शहारतो रोमरोम ,

हर्षित झाले मन ,

सजना तुझ्या साठी,

मी आले चालून ...



Rate this content
Log in