महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा
जय जय महाराष्ट्र देशा
उभ्या जगाला तुच आशा ||धृ||
थोर पुण्याई येथे जन्मले साधुसंत
महाराष्ट्र भुमी पावण झाली
रंजल्या गांजल्याचे दुख वाटण्या
हीच माती धाऊन आली। (1)
सह्याद्रीचा नाद गुंजला दिल्लीकडे
इतिहासाची उलटुन पाने पहा खास
दिल्लीला ही जरब बसविली अशी
धाडसी कामगीरी होते सहास (2)
महाराष्ट्र माझा शूर छत्रपतींचा
वाकडी नजर टाकता फोडीतो डोळा
जखमांचे घाव झेलुनी पोशितो आम्हा
चालवितो नांगर होशिवसांभ भोळा (3)
कृष्णा कोयना माता गोदावरी
थुईथुई नाचत वहाते कडेकपारी
हिरवे मळे पिक डोले आनंदाने
तुझ्या पुण्याईने पडल्या राशी दारोदारी (4)
मोठी संस्कृती महान इथले संस्कार
दगडाची मनोभावे करिती पुजा
वृक्षानांही म्हणती सगे सोयरे
पशुपक्षा प्रती भाव नाही दुजा (5)
ठिणगी पेटली येथे स्त्री शिक्षणाची
पोवाडा लोककलेचा होतो जागर
लहान थोर नाही कुणी एकच नारा
महाराष्ट्र आमचा सर्वाना देतो आदर (6)
येथे धर्म प्रसार अनेक कोरल्या लेणी
वेगवेगळे धर्म अनेक आमच्या जाती
सर्वधर्म सहिष्णुतेचे बांधुन तोरण
महाराष्ट्राला प्रगत करते अभंग नाती (7)
येथे जन्मले विविध साहित्य
एकच आमची विचार सरणी
कलागुण शिक्षण किर्ती वैभवशाली
संस्काराचा वारसा पुढे नेई धरणी (8)
महाराष्ट्र भूमी वीर जिजाऊ सावित्रीची
समाजसेविका थोर कर्तृत्वाची गाथा
येता संकट सळसळे रक्त नसातून
पावनभूमी महाराष्ट्राची टेकविते माथा (9)
