मौनामध्ये बोलू आपण
मौनामध्ये बोलू आपण

1 min

156
जगावेगळी अबोल भाषा
सुरेल होतील यापुढचे क्षण
मौनामध्ये बोलू आपण
मौनामध्ये बोलू आपण ||१||
शब्दांमध्ये कुठली क्षमता
दोन मने संवाद साधता
ठेवू धजती दोघां बांधुन
मौनामध्ये बोलू आपण ||२||
असली कसली उदासीनता
आतुरता तरीही निष्क्रियता
व्यक्त व्हायचे वाटे बंधन
मौनामध्ये बोलू आपण ||३||
बरेच काही उसळे आतून
शब्दांतुन ना ये साकारुन
कसे ठेवणे मनात दाबुन
मौनामध्ये बोलू आपण ||४||
कुणी न काही केले तरीही
बरेच काही झाले कारण
काय जाहले कसे जाहले
तनामनाचा पुसतो कणकण ||५||
शस्त्रकर्म ते रक्तहीन, पण
करणे आहे आवश्यक पण.
अग्निपरीक्षेतच दोघेजण
मौनामध्ये बोलू आपण ||६||