STORYMIRROR

Shital Motewar

Others

2  

Shital Motewar

Others

….मैत्रीत तुझ्या....

….मैत्रीत तुझ्या....

1 min
2.6K


मनामनाचे सूर जुळू दे
वैर सारे दूर पळू दे
अंतकरणाची कळी उमलू दे
अबोल भावना व्यक्त होऊ दे  
 
मैत्रीत तुझ्या....
मनोकामना पूर्ण होऊ दे
ऋणानुबंध वृद्धिंगत होऊ दे
विश्वासाला आलिंगन दे 
रेशीमगाठी अतूट बसू दे 
 
मैत्रीत तुझ्या....
वेदनांना थारा नसू दे 
सुसंवादात माणुसकी जगू दे 
सूर्याची तेजस्वी लाली चढू दे 
आनंदाची वेल गगनी भिडू दे 
 
मैत्रीत तुझ्या....
सावलीसारखी मायेची पाखरण दे 
इंद्रधनुपरी रंग उधळू दे 
सोन्यापारी लक्ख झळाळू दे
साखरेसारखी गोड विरघळू दे 
मैत्री तुझी न माझी  
आराशापरी पारदर्शी होऊ दे


Rate this content
Log in