Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Motewar

Others

2  

Shital Motewar

Others

माया

माया

1 min
6.9K


*माया* चिमणीची पिलांवर
घरट्यासी लिंबलोन
मऊमऊ
कपास
ममत्वाची आरास
दुःख झेलले पंखावर


उदात्त उदाहरण *माये*चे
अनाथांवर सिंधुताईंची
छत्रछाया
वरदहस्त
निःस्वार्थ ऋणानुबंधांचा
सावट दूर उदासीनतेचे


आमटे परिवाराचे समर्पण
कुष्ठरोग्यासही लावली
*माया*
संरक्षण
जीवापाड पशुपक्ष्याचें
सेवार्थ फुलवले आनंदवन


निस्वार्थ मातृत्व, दातृत्वाची
संततीप्रती आभाळागत
*माया*
कृतघ्न
मुलांची परतफेड
वाट दाखवी वृद्धाश्रमाची


कित्येक सैनिकांची आहुती
तिरंग्यास सलामी
अजरामर
*माया*
मातृभूमीवर तयांची
दशदिशात अक्षय कीर्ती


मायमातीस फुलविणाऱ्या पोशिंद्याची
आभाळागत *माया*
आबादानी
शिवार
झोपडीला आधार
किमया जादूगार पावसाची


जगण्याचा एकमेव वर्म
परस्पर *माया*
मानवधर्म
सेतू
भविष्य सुखाचा
सूर्य उद्याचा सत्कर्म




Rate this content
Log in