मैत्रीची पाऊलवाट
मैत्रीची पाऊलवाट
1 min
11.5K
मैत्रीची तुझ्या साथ असू दे
ओठांवर तुझ्या माझं नाव असू दे
पानांच्या वेलींवर
आपल्या मैत्रीचे बिंदु असू दे
गालावर तुझा आपल्या मैत्रीची खळी असू दे
रंगुनी मैत्रीच्या रंगात रमायचंय असं
चंद्राच्या आकाशात तारे जसे
सोबती माझ्या सहवास तुझा असू दे
देखणा चेहरा तुझा तरसतो मी पुन्हा पुन्हा
मैत्रीची चाचणी चखतो मी पुन्हा पुन्हा
विनंती माझी देवा तुझ्या चरणी
मैत्री ही आमची राहू दे कायमस्वरूपी
सोबत नेहमी राहायचं तुझ्या
हृदयात वास करायचा तुझा