STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
366

माझ्या मराठीची शान

द-याखो-या ग सांगते !

बोल मराठीचे श्लोक

तुका,ज्ञानोबा बोलते...!!


माझ्या कवितेला साज

शब्द मराठी लावते !

बोल मराठीचे थेट

काळजाला हो भिडते....!!


माझी बहिणाई,जनी

ओवी जात्यावर गाते !

धमन्याधमन्यातही 

माय मराठी वाहते....!!


ओवी, भारूड, पोवाडा

साजश्रृंगारही घेते !

बोल बोबडेही बाळं

शब्द मराठीच येते....!!


बोल किर्तनाचे रंगी

साज मराठी लावते !

बोल मराठीचे मृदू

नित्य मनाला भावते....!!


गीत,गझल, सुंदर

शब्द झंकार मांडते

शिवशंभू संस्कारीत

शब्दमोती हे सांडते....!!


माझ्या मराठीची शान

दाहीदिशा नित्य गाजे !

माझ्या मराठीचा डंका

सा-या जगात हो वाजे....!! 


Rate this content
Log in