STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

मावळतीचा सुर्य

मावळतीचा सुर्य

1 min
300

मावळतीचा सुर्य

खुप काही शिकवून गेला

नव्या सुर्याला समज देवून गेला

बेफिकीरीने जगणारी माणस 

किती विवंचनेत जगलीत

एकमेकांपासून

अंतर ठेवून बराच काळ राहिलीत


कधी आभाळाकडे न

बघणारी माणस

रोज नव्या आशा अपेक्षांच्या किरणांची वाट बघायचे

काळजीत राहून

जगं अस्तित्वात असल्याचे

डोळे भरून बघायचे

सर्वत्र शुकशुकाट स्मशानशांतेने

माणसु जिवंतपणीच मेला होता

स्वतःपासून दुर कुठेतरी हरवला होता


भिंतीवर कॅलेंडर होते

पण वार आणि तारखी दिसत नव्हती

दिवसा मागून दिवस जाताना

दुसरा दिवस बघण्याची 

कोणाला शास्वती नव्हती

एकाच जागी थांबून राहणे 

प्रत्येकाला जमायचे नाही 

दिवस आहे की नाही

काही कोणाला कळायचे नाही


माणूस घरात कोंडला 

गेला तेव्हा कुठे

माणसाला आपली माणस दिसायला लगलीत

एकमेकांसोबत राहुन

जगायला लागलीत


पळणारी पाय थांबले

तेव्हा घराला घरपण मिळाले

आपल्या माणसांच्या सहवासात जगणे कळाले

नेहमीच आपल्या गुर्मीत

राहणारा माणूस

एका क्षणात जमीनीवर आला

एक संकटाने माणसाला 

माणसात आणला


पुढेपुढे चालणारा माणूस

आपुलुकीने कुणाची विचारपुसही करत नव्हता

जरा क्षणभर थांबुन

मागे वळून बघतही नव्हता


वेळकाळ केंव्हा कुठे कशी येईल

काही सांगुन येत नाही

होत्याचे नव्हते करायला

कुणाची अनुमती घेत नाही

वेळकाळ कशीही येवू देत

प्रत्येक माणसाला आपलाच समजायचे

माणसाने माणसाशी माणूसकीनेच वागायचे 


खरच गेला तो काळ 

खुप काही सांगुन गेला

माणूस जोडण्याची

कला शिकवून गेला


Rate this content
Log in