मातीचा सुगंध
मातीचा सुगंध
1 min
220
का मनी लागली काहूर धुंद पावसाची
लावेल वेड मजला तुझ्याच आठवणीची
थेंब पावसाचे मोहून टाकतील मजला
या निशांत कायेला ओढ आहे भिजण्याची
तू दूर असा का अजाण राहुनी बसला
मनी भावनांच्या गुंत्यातून रुसूनी उठला
हे बोल प्रीतीचे सांगतात मनातील भाव
तुझ्याच स्पर्शातून येईला मातीचा सुगंध
धुंद अबोल चिंब झाल्या सरी पावसांच्या
ओथंबूनी निळ्या निळ्या रेषा पाण्याच्या
झोंबणार्या वाऱ्याला घेऊन भेटशील का
तू माझ्यातील माझा निःस्वार्थ होशील ना
