वेदना
वेदना
1 min
172
दुःख डोळ्यांतील वेदनातही का
झाल्या अबोल पापण्या
मन गहिवरले असतानाही का
झाल्या धुंदीत चांदण्या
शांत सागरातील वाळूच्याही का
झाल्या बोलक्या रेषातंरा
चित्त शांततेतील वादळासही का
झाल्या अंतराती खाणाखूणा
स्वर्ग सुखातील मोहातही का
झाल्या मृत्यूच्या वाकण्या
अश्रू थेंबातील जलातही का
झाल्या मनाच्या चिंधड्या
नभी वर्षातील धारांतही का
झाल्या इंद्रधनुला कमान्या
अंत पाहण्यातील शय्येतही का
झाल्या प्रारंभीच्या सावल्या
