श्रावण
श्रावण
1 min
246
श्रावण आला श्रावण आला
ओथंबून सारे निळे वाहिला
सुंदर शूशमंत गंध घेऊनी
रिमझिम त्या छंदात नाचुनी
धरणीवर त्या गीत गाऊनी
श्रावण आला श्रावण आला
शितल मंजिरी मंजुळ रेखा
समांतर क्षितिजा सम सारखी
गंगेच्या पदरास परी किनारी
लाभलेली निळा अंबराची रेखा
आला श्रावण आला
नवलाईत नवी नहाली माधुरी
नितल कांचना रुप लाजिरे
यौवनातील गंध फुल साजिरे
पसरून चौफेरी सुगंध दरवळत
श्रावण आला श्रावण आला
