पाऊस आला
पाऊस आला
1 min
217
पाऊस आला पाऊस आला
झाडावर घेऊनी नवी लकाकी आला
पानाफुलांनी बहरून आला
फुलांचे सुगंध दरवळून आला
फळांचे रस सांडत आला पाऊस आला
नदीतून झुळझुळ वाहत आला
झर्याला संगती घेऊन आला
ओढ्याला खळखळ वाहून आला
वाटेवर रिमझिम ठेवून आला पाऊस आला
डोंगर दरीतून खेळ खेळत आला
दरीतून उड्या मारत आला
धरणीवरून लोळत लोळत आला
पाऊस आला पाऊस आला
