माणुसकी
माणुसकी
1 min
311
नाती नाही गोती नाही
तरीही होते दुःख अपार
दुसर्यांसाठी मन तळमळती
देती एकमेका आधार
स्वार्थी या दुनियेमध्येही
माणुसकीला पाझर फुटतो
तेव्हा होतो आनंद अन्
मानवजातीचा गर्व वाटतो
तनामनाने अन् धनाने
मदतीचा होतो ओघ सुरू
दर्या मिटती माणसांमधल्या
जातीभेद लागतो हरू
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
सुखदुःखे तर येतच राहतील
मानव खरे ते जे इतरांच्या
दुःखामध्ये धावून जातील
माणसाने माणसाला
माणसाप्रमाणे समजावे
एकच आहोत आपण सगळे
अटळ सत्य हे उमजावे
