STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

माझ्या गावची माती

माझ्या गावची माती

1 min
433

माझ्या गावची ख्याती

दुर दुर झाली

माझ्या गावाच्या मातीने

दिशा जगण्याची दिली


माझ्या गावाच्या मातीचे

किती गुण गायचे

थोर उपकार तिचे

ऋण नाही फिटायचे


माझ्या गावाची माती

किती जीव लावते

अंगाखांद्यावर खेळवून

कडेवर घेते


माझ्या मातीचा टिळा 

कपाळी लावतो

दाहिदिशात जणू

अबिर गुलाल उधळतो


माझ्या नावाची ओळख माझ्या गावामुळे झाली

माझ्या गावाच्या मातीने

माझ्या नावाला चकाकी दिली


माझ्या गावाच्या मातीमुळे

नाव मोठे झाले किती

गौरव मातीचा होतो तेव्हा

फुलते माझी छाती


गेलो जरी दुरदेशी

तरी माझ्यात माझे गाव आहे

माझ्या मातीसाठी

माझी गावाकडे धाव आहे


अशी माझ्या गावाची माती

तिला मी माय म्हणतो

माझ्या मातीच्या चरणी

नतमस्तक होतो


Rate this content
Log in