माझी आस तू
माझी आस तू


आयुष्याच्या आकस्मिक वळणावर
अवचित भेट तुझी झाली
मोहरली काया अन
गाली आली लाली
शब्द तू कवितेचा
तू शब्दाचा अर्थ
पंखातील बळ तू
तुझ्याविना जीवन व्यर्थ
आशेचा प्रत्येक किरण
तूच माझी आस
मनी अखंड लागला
फक्त तुझा ध्यास
हळवा कोपरा मनाचा
तू आनंदाचं आभाळ
साथ तुझी हवी
असो कसाही काळ
तुझ्यामुळे येतो माझ्या
आयुष्यात सुखाचा बहर
मात संकटावर करूया मिळून
जरी अडचणींनी केला कहर