MEENAKSHEE P NAGRALE

Others

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

माझा भारत

माझा भारत

1 min
174


माझा भारत

सुजलाम् सुफलाम

करितो आम्ही

त्याला प्रणाम.....


सुख समृध्दी

इथे नांदते

दाही दिशा

गूज सांगते.....


द-याखो-यात

एकच नाद घुमतो

ऐक्याचा झेंडा

गगणी फडकतो...


नानाविध प्रकार

भिन्न जरी भाषा

एकदिलाने राहू

ठेवू उद्याच्या आशा...


लोकशाही आदर्श

संविधान महान

जगामध्ये मोठे

भारतीय संविधान....


ऐक्य व परंपरेचे

जपू आम्ही वारसा

न्याय निती अवलंबून

पुढे जातो सहसा....


तिरंगा आमची शान

तिरंगा आमचा प्राण

भारत भूच्या मातीसाठी

देवू उद्याला प्राण.....



Rate this content
Log in